Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

नागराज आणि सैराट

 




नागराज मंजुळे यांचे चित्रपट पाहून चित्रपट निर्मितीतील काही गोष्टी ज्या वाटल्या त्या नमूद करीत आहे 

1.   मराठी अभिनेत्यांना बॉलीवूडवाले थोडे दचकून असतात कारण मराठी कलाकार हे नाटक किंवा बॉलीवूडच्या भाषेत स्टेज करून आलेले असतातत्यांच्या टायमिंग वर नेहमी बोललं जातंत्या सर्व कलाकारांना मिळून जी लोकप्रियता मिळाली नसेल ती  नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातील नवख्या कलाकारांना मिळत आली आहेयाला कारण नागराज त्या सर्व कलाकारांना महिनोन्महिने एकत्र ठेऊन त्यांच्यात bonding निर्माण करून एकमेकांची सवय करवून घेतातत्यांच्या प्रत्येक सहज हालचालींना आपल्या पटकथेत स्थान देतात जेणेकरून त्यांना वेगळा अभिनय करावाच लागू नये आणि जिथे गरज असेल तिथे ते स्वतते कसं करायचं सांगतात आणि सहजगात्या त्यांच्याकडून करून घेतातत्या नवख्या कलाकारांना त्या सर्व स्टेज करून आलेल्या कलाकारांप्रमाणे किंवा त्यांच्या थोडं जवळ जाऊन अभिनय करू शकतील इतपत तयार करतात  

2.   एकीकडे मुख्य कलाकर नवीन घ्यायचे जेणेकरून चित्रपटाला एक फ्रेश लूक येईल आणि दुसरीकडे छाया कदमसौमित्रज्योती सुभाष सारखे मुरलेले कलाकार घेऊन तो चित्रपट म्हणजे एक परिपूर्ण अनुभवाचं पॅकेज तयार करून द्यायचं हा फंडा खरंच यशस्वी ठरला आहे.    


  

3.   दुसरं - चित्रपट सृष्टीत लॉबिंग ही काही नवी गोष्ट नाहीएकाच पक्षातील राजकीय पुढाऱ्यांचे जसे काही गोट असतात तसे बॉलीवूडमध्येही चित्रकर्त्यांचे कंपू असतातसुशांत सिंग राजपूतच्या निमित्ताने हे आपण पाहिलं आहेनागराजच्या चित्रपटांवर एक  नजर टाकली तर या अनुषंगाने काही गोष्टी समोर येतात – ‘पिस्तुल्याचा नायक सुरज पवार हा नागराजच्या पुढच्या ‘फँड्री’ सिनेमात सहकलाकार होतो आणि सैराटमध्ये थेट विलन होतोहीच कथा आकाश ठोसरचीसैराटमधला गोडचॉकलेट हिरो ‘झुंडमध्ये विलन होतोसोमनाथ अवघडे (जब्या), रिंकू राजगुरूची  (आर्ची) ‘झुंड’ मधलं रूप पहिल्यापेक्षा खूप वेगळं होतंसुरज आणि आकाशचं स्थित्यंतर आणि सोमनाथ अवघडेरिंकू राजगुरूची उपस्थिती मला साधी वाटत नाहीआपल्या पहिल्या चित्रपटातले हे नवखे असणारे आणि उत्तरोत्तर आपल्या अभिनयाला तासून प्रगल्भ करणारे हे कलाकार स्टेज करून आलेल्या कलाकारांपेक्षा फार कमी नाहीतबॉलीवूडमध्ये त्यांचा अजून दबदबा तयार झाला नसला तरी नागराजने आम्ही सुद्धा कंपू बनवू शकतो हे दाखवून दिलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.



4.   सुशांत सिंग राजपूतला आउटसायडर म्हणणाऱ्यांना नागराज आम्ही पण इथलेच आहोत आणि तुम्हाला आमचीही दाखल घायवी लागेल हेच तर सांगत नाही ना?

5.   दाक्षिणात्य सिनेमे इथे हिंदी डब करून दाखवतातमग मराठी सिनेमांचे रिमेक का होतातते तोंडावर आपटले तरी त्यांना काही वाटत का नाहीदक्षिणात्य सिनेमात असणारी मारधाडवीएफएक्स आणि स्पेशल इफेक्ट्सचं रिमेक करणं शक्य नसेल कदाचित म्हणून त्यांचे रिमेक  होता ते डब होतातपण ते डब होऊन हिंदींत चालतातपण मराठी सिनेमात महागडे आणि अमानवी स्पेशल इफेक्ट्स नसले तरी त्यांची भाषा नी संस्कृती बदलून त्याचा चीनपाट रिमेक करून ते रिमेककर्ते पायावर धोंडाच मारून घेतात त्याचं कायमराठीचा  नाद करायचा नाय म्हणतात तो हा असातुम्ही रिमेक मध्ये सर्व द्याल भौ... पण मातीतलं सैराटत्व कुठून देणारते सरबरून  टाकणारं याड कसं लावणारंयासाठी जातीचे नाही तर मातीचे कर्ते लागतातसमाजात मोठ्या प्रमाणावर होणारी पण चित्रपट सृष्टीत कधीही  झालेली गोष्ट कोणती हे हुडकून काढून डॉबाबासाहेब आंबेडकर जयंती सारख्या उत्सवावर जाणीवपूर्वक आणि निगुतीने काम करणारे नागराज हे तसेच मातीतले चित्रकर्ते.

वरील सर्व बाबी ह्या वैयक्तिक विश्लेषणातून आल्या आहेतचूक बरोबर काहीही असल्यास कमेंट करून कळवावे 

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement